top of page

महाराष्ट्रात एमपीएससी पेपरलिकवर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या भरती परीक्षेमध्ये अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये परीक्षेच्या संदर्भात विधान केले आहे. मार्च 2026 मध्ये एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या ‘ ड्रग इन्स्पेक्टर’ (औषध निरिक्षक) भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुट झाल्याचे आरोप रोहित पवारांनी केले आहे.


22 मार्च रोजी झालेल्या एमपीएससीच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी हा पेपर फुटला होता. 20 मार्च 2026 रोजीच संबंधित प्रश्नपत्रिका आणि उत्तर व्हॉट्सअ‍ॅपवर पीडीएफ स्वरुपात पोहोचल्या होत्या, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या 100 प्रश्न हे फुटलेल्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत आहेत. हा पेपर 12 लाख रुपयांना विकला गेला होता, तसेच उमेदवारांकडून त्यासाठी 5 लाख रुपयांची आगाऊ रक्कम म्हणजेच एटव्हान्स पेमेंट मागण्यात आल्याचा अरोपही रोहित पवारांनी केला आहे.


रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार, या पेपरफुटीमागे रॅकेट असून या कथित रॅकेटचा संबंध नंदुरबारमधील एका शैक्षणिक अकॅडमीशी होता. या संस्थेद्वारे पैसे घेऊन उमेदवार आणि त्यांचे पालक यांनी पेपर विकत घेतले. एमपीएससी सारख्या आयोगाच्या भरती परीक्षेच्या पेपर फुटीमागील रॅकेटचा तपास करण्यात यावा आणि दोषींना पकडून त्यांच्यावर कडक करावाई व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी प्रशासनाकडे केली आहे.


विद्यार्थ्यांनी जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे या कथित पेपर फुटीबाबत अधिकृत तक्रार दाखल केली होती. पण त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. ठोस पुरावे उपलब्ध असूनही भरती परीक्षा पेपर फुटीच्या या प्रकरणाची सखल चौकशी का करण्यात आली नाही असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने हे पेपर फुटीचे सर्व आरोप फेटाळून लावले. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्याचे आयोगाने म्हटले. तरीही प्राप्त तक्रारीची पडताळणी केली जाईल. पण जर हे आरोप खोटे असल्यास किंवा यातून आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Comments


bottom of page