top of page

महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास आयोगाचा नकार; राहुल गांधीची मागणी



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयांद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणुक अयोगाकडे मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज मागणार्‍या कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आयोगाने नकार दिला आहे. असे केल्यास मतदारांच्या गोपनियतेचे आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे ठरेल असे आयोगाने म्हटले आहे.


निवडणूक आयोगाच्या अधकिर्‍यांनी शनिवारी आयोग अशाप्रकारचे फुटेज देणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने केलेली मागणी ही त्यांच्यासाठी ठिक असली, तरी मतदारांच्या हिताची असली किंवा लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी योग्य असली तरी देखील प्रत्यक्षात त्याचा उद्देश असली किंवा लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी योग्य असली तरी देखील प्रत्यक्षात त्याचा उद्देश अगदी उलट उद्दिष्ट साध्य करण्याचा असल्याचे या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.


या मागणीला अतिशय तार्किक मागणी म्हणून सामोर आणले जात आहे. ती प्रत्यक्षात मतदरांच्या गोपनियतेचे आणि सुरक्षिततेच्या चिंतेचे उल्लंघन आहे. हे लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 आणि 1951 मध्ये घालून दिलेल्या कायदेशीर भूमिकेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. असे फुटेज शेअर केले तर ज्यांनी मतदान केले आहे आणि ज्यांनी मतदान केले नाहीय त्यांच्या गोपनियतेला धोका निर्माण होईल. दोघेही असामाजिक घटकांचे लक्ष्य बनू शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला मतदार ओळखणे सोपे जाईल, अशी भीती निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी व्यक्ती केली आहे.


याचबरोबर निवडणूक आयोगाने या निवडणुकांची सर्व सीसीसटीव्ही फुटेज, व्हिडिओ 45 दिवसांत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ज्याच्याकडून उत्तर हवे होते तोच पुरावे नष्ट करत आहे. हे स्पष्ट आहे की सामना फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Comments


bottom of page