महाराष्ट्र पुन्हा हादरला: पुण्यानंतर बीडमध्ये तिन वर्षाच्या चिमुकल्या नतीवर नराधम आजोबाचा अत्याचार
- Navnath Yewale
- May 4
- 1 min read

बीड: पुण्यातील नसरापूर येथील घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून आरोपींना तत्काळ फाशीच्या माृगणी होत असतानाच आता बीडमधून महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली आहे. तिन वर्षाच्या चिमुकलीवर एका 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युसूफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एका गावात एक विवाहित तरुणी आपल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह माहेरी आली होती. 16 ते 25 एप्रिल दरम्यान संधी साधून या तरुणीच्या वडिलांनी (मुलीच्या आजोबाने) स्वत:च्याच 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार केला.
या कृत्यानंतर चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्याच वडिलांनी पोटच्या नातीसोबत असे घृणास्पद कृत्य केल्याचे ऐकून आईला मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या आईने तातडीने युसूफ वडगाव पोलिस ठोण गाठूनद तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आजोबाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच ‘ पिंक पथका’ चे पोलिस उपनिरिक्षक प्रकाश शेळके यांनी तात्काळ आरोपी आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून भोर, चाकण आणि आता बीडमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. कठोर कायद्यांची मागणी केली जात आहे.



Comments