महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
- Navnath Yewale
- May 2
- 1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाकडून आज शनिवार दि. 2 मे 2026 दुपारी 12 बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. 12 (एचएससी) बोर्ड परीक्षा 10 फेब्रूवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान राज्यात घेण्यात आली. सुरळीतपणे राज्यभरात या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होती. अखेर निकाल जाहीर झाला. बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत निकाला जाहीर करण्यात आला. नेहमीसारखेच राज्यात यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. निकालात मुलींचा टक्का वाढला आहे. विभागीय निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली. बोर्डाने निकालाबद्दल सांगाताना म्हटले की, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा निहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती.
हेल्पलाईन सुरू केली होत. 153 विषयांची परीक्षा झाली निकालात कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभाग अव्वल ठरला. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूर पॅटर्नला या निकालात मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने जोर दिला. यादरम्यान मोठी कारवाई आणि 15 एफआयआर दाखल करण्यात आल्या.2024 मध्ये एक दीड टक्क्याने कमी लागला आहे. दर वर्षी दीड दोन टक्के निकाल कमी लागत आहे. नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला वाणिज्य आयटीआयसाठी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास झालेले विद्यार्थी 89.79 यामध्ये 17 नंबरचा फॉर्म भरणारे 36 हजार 941 प्रविष्ट झाले. उत्तीर्ण झालेले 29 हजार 634 , टक्केवारी 21 रिपीट एकूण 50 हजार 346 विद्यार्थी 18 हजार 349 उत्तीर्ण.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्यसा निकालात मुलींनी बाजी मारली. दरवर्षी निकालात कायमच मुली अव्वल असतात. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासोबतच कोकण विभागने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. निकालात कोकण विभागच अव्वल ठरला आहे. आता काही मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून 7 वेबसाईट जाहीर करण्यात आल्या आहेत.



Comments