महाराष्ट्र भाजपच्या नव्या अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटच्या अध्यक्षपदी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांची या पदावर एकमताने नियुक्ती करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांची निवड महत्वाची मानली जात आहे. रवींद्र चव्हाण फडणवीस आणि राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे जवळचे मानले जातात.
मुंबईतील वरळी येथे आयोजीत कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरेन रिजूजी यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते यावेळी उपस्थित होते. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले की, रवींद्र चव्हाण विरोधकांचे तेरावे करतील, विरोधकांचे बारा वाजविल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत.
रवींद्र चव्हाण भाजपचे 12 वे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजप अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, 25 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीत सामील झालोे. आमची विचारसरणी तितकीच शुद्ध आणि गंगा म्हणून वाहते. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रवाद, ही विचारसरणी देणारी ही गंगा, मला तिच्या मुख्य प्रवाहात स्थान दिले. या विचारसरणीने मला सामाजिक जाणीव दिली. जीवनाच्या मार्गात मार्गदर्शन आणि उद्देश दिला आणि जगण्याची दिशा दाखवली.
“ मी माझ्या आनुभवावरून असे म्हणू शकतो की, जर प्रत्येक कार्यकर्ता विचारसरणीचे रक्षण करेल तर तीच विचारसरणी त्याचे रक्षण करेल. चव्हाण पुढे म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, अधिकारी, कार्यकर्त्यांचे अमूल्य पाठबळ आणि जनेतचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्यांच्या प्रेम आणि विश्वासाच्या बळावर मी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आत्मीयता खूप महत्वाची असेल. आज भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर पोहोचू शकतो, ही संघटनेची खरी ताकद आहे.
प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला ही शक्ती मिळावी, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, हे माझे वचन आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व वरिष्ठ नेते, अधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल भाजपा परिवाराचेही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी मानले.
दरम्यान, रवींद्र चव्हाण हे सावरकरांचे कट्टर अनुयायी मानले जातात. मॉरिशस महाराष्ट्र मंडळात स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचा पुतळा बसवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बाजावली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. रवींद्र चव्हाण यांचा अनुभव आणि संघटन कौशल्य पाहता, पक्षाला आगामी निवडणुकांत त्यांच्याकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 1 जूलै रोजी झालेल्या या घोषणेनंतर, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि त्यांनी स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
Comentarios