top of page

महाराष्ट्र मराठी राज्य, इथे मराठीचीच सक्ती पाहिजे, - जरांगे पाटील


महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सगळीकडून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही यासंदर्भात विरोध दर्शवत आहेत. अशातच त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व सबंधीतांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला आहे.


अंतरवालरी (सराटी) येथे पत्रकारांनी जरांगे पाटील यांना सरकारच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात हिंदी भाषा सक्तिबाबत प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले की, ‘ हे मराठी राज्य आहे, इथे मराठीचीच जास्त सक्ती पाहिजे, ती भाषा सगळ्यांना यायला पाहिजे, एक प्रकारे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण मराठीचं काय? देशभरात मराठीची सक्ती करणार आहेत का? ती पण करायला हवी मग. या राज्यांत ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी आली पाहिजे त्यांच्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे. ही गोष्टही खूप महत्वाची आहे. अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु त्याहीपेक्षा आमचा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्याच प्रश्नावर आमचा जास्त —फोकस आहे. ते झाल्यावर बाकीच्या प्रश्नांकडे बघू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


सरकार काय करत आहे, हे आम्हाला माहित नाही.पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. आरक्षण ओबीसीतून घेणार आणि समाजाला मिळवूनही देणार. मी आणि माझा सामज एकही पाऊल मागे सरकणार नाही. मराठ्यांची काय लाट असते, ते 29 ऑगस्टला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला कळेल, मराठे काय चीज असतात. आता आम्ही मुंबई सोडत नाही. मराठा आरक्षण 100 टक्के घेतल्याशिवाय माझ्यासकट एकही मराठी माघारी फिरणार नाही. तुमची मुंबई बंद पडेल की, सुरू राहील, ते आम्हाला माहिती नाही. परंतु आम्ही 100 टक्के आरक्षण मिळवणार, असा एल्गार पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला.

Comments


bottom of page