महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थ्यांसाठी ‘केवाईसी’ बंधनकारक
- Navnath Yewale
- Jun 23
- 1 min read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. दरम्यान, एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी करावी लागणार आहे.
ज्यामध्ये आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाईन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी याचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना (एमपीएससी) उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भाने एमपीएससी मार्च 2017 पासून ऑनलाईन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरित्या प्रमाणिकरण करता येेणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.
Comments