महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अचानक लागली आग!
- Navnath Yewale
- May 19
- 2 min read

दक्षिण मुंबईत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आज अचानक आग लागली. सुदैवाने आग लवकरच अटोक्यात आली आणि कोणतीही जीवतहानी झाली नाही. दुपारी 3 :00 च्या दरम्यान लागलेली ही आग सुरक्षा स्कॅनिंग मशीनमधील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. सुरक्षा कर्मचार्यांनी आणि अग्निशमन दलाने आग लागल्यानंतर काही मिनिटांतच ती आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे आग तात्काळ आटोक्यात आली आणि मोठी जीवित आणि वित्तहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील महाराष्ट्र विधानसभेतील सुरक्षा स्कॅनिंग मशीनमध्ये आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये प्रवेशद्वारावर धूर दिसत आहे.
27 एप्रिल 2025 रोजी सकाळी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आग लागली. सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. पण यामध्ये ईडी कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेल्या फायली जळाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, सर्व रेकॉर्ड ईडीकडे ऑनलाईन उपलब्ध आहेत.
कापड कारखाण्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील एका कापड कारखान्यात एक दिवसापूर्वी भीषण आगीची घटना घडली होती. ज्यामध्ये दोन कुटुंबातील आठ जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात एका लहान मुलाचाही समावेश होता. रविवारी पहाटे 3:45 वाजता मुंबईपासून 400 किलोमिटर अंतरावर असलेल्या सोलापूर एमआयडीसी परिसरातील अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्सटाईल मिल्समध्ये हा अपघात झाला. अधिकार्यांनी सांगितले की, आगीचे कारण शॉर्टसर्किट होते, ज्यामुळे कापड कारखान्यात आग लागली.
या घटनेत, अधिकार्यांनी कारखान्याचे मालक हाजी उस्मान हसनभाई मन्सूरी (80), त्यांचा नातू अनस हनीफ मन्सूरी (25), अनसची पत्नी शिफा अनस मन्सूरी (20) आणि त्यांचा दिड वर्षाचा मुलगा युसूफ मन्सूरी अशी मृतांची ओळख पटवली आहे. इतर चार मृतांची ओळख पटली आहे ज्यात मेहताब सय्यद बागवान (45), त्यांची पत्नी आशाबानू (38) आणि त्यांची मुले सलमान (20) आणि हिना (26) यांचा समावेश आहे. जेव्हा कारखान्यात आग लागली तेव्हा हे सर्व लोक झोपले होते दुर्दैवाने त्यांचा आगीत मृत्यू झाला.
Comments