महाराष्ट्र संतापला: अकोल्यात 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार; 60 वर्षीय नराधमावर पोलिसात गुन्हा, आरोपी फरार
- Navnath Yewale
- May 6
- 2 min read

अकोला: सध्या राज्यात नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणार्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणार्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणार्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केला आहे.
पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती. मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई- वडिीलांना सांगितल्यानंतर चान्नी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांची तीन पथकं आरोच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडिल हे शेतात मोलमजुरी करून आपला उदनिर्वाह करतात, आई वडील कामावर गेल्यानंतर शेजारीच राहणार्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केला. भीतीने चिमुरडी घरी सांगत नव्हती पण आई वडीलांनी तिला विश्वासत घेऊन विचारल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली, या घटनेनं परिसरात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीस तत्काळ अटक करून कठोर फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.
मागील काही कालावधीपासून चिमुकल्यांवर अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष कायद्याची अवश्यकता असताना शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावीण करण्यात यावी, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विरोधात कठोर कायदा काळाची गरज आहे. दरम्यान कालच राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पॅरोलवर बाहेर येता येणार नाही असा निर्णय घेतला आहे.
पुण्याच्या नसरापूर मध्ये एका साडेतिन वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिचा निर्घून खून केला. बीडच्या केजमध्ये 55 वर्षीय आजोबानेच एका 9 वर्षीय नातीवर अत्याचार केला, पुण्याच्या पर्वतीमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध नराधमाचा चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न फसला. यार्स घटना अलिकडच्या आठवडाभरातील असतानाच आता अकोला येथील या घटनेमुळे महाराष्ट्रा पुन्हा हादरला आहे.



Comments