top of page

महाराष्ट्र हादरला; खदानीत अढळले पाच मृतदेह, अपघात की घातपात मृतांमध्ये चिमुल्यांचाही समावेश



नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका जुन्या खाणीच्या खड्यात भरलेल्या पाण्यात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, ही हत्या, आत्महत्या की अपघात आहे, या बाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.


सुरगाव शिवारातील ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. स्थानिक रहिवाशांनी खाणीच्या खड्यात काही मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले आणि तातडीने पालिसांना माहिती दिली. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाण्यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.


हे सर्व पर्यटनासाठी या भागात गेले होते, मात्र कालापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नागपूरच्या दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नोंदवली होती. यानंतर तपास सुरू झाला आणि अखेर कुही तालुक्यातील जुनी खदान हे ठिकाण शोधून काढण्यात आले. त्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली असता पाच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रोशनी चंद्रकांत चौधरी (32), तिचा मुलगा मोहित (12), मुलगी लक्ष्मी (10), बहिण रज्जो राऊत (25) आणि इतिराज अन्सारी (20) यांचा समावेश आहे. सर्वजन धुळे व नागपूर येथील रहीवासी होते. प्राथमिक माहितीनुसार हे सर्वजन फिरायला आले असावेत, मात्र नेमकी दुर्घटना कशी घडली याचा तपास कुही पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तपासाला सुरवात: पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात ही दुर्घटना आहे, सामुहिक आत्महत्या आहे की हत्या, याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. खाणीच्या खड्यातील पाणी खोल असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.


परिसरात भीतीचे वातावरण : ही घटना घडल्यानंतर सुरगाव शिवार आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खाणी बंद झाल्यानंतर त्यातील खड्डे पाण्याने भरले गेले, जे स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. “ अशा खड्यांवर कुंपण किंवा सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे, ” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

Commentaires


bottom of page