महाराष्ट्र हादरला: पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; नराधम आरोपीस अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या
- Navnath Yewale
- May 2
- 1 min read

पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे, प्रामुख्याने महिला, मुलींवरील अत्याच्याराचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहीला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षीच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचारानंतर तिची निर्घुन हत्या केली. हत्येनंतर आरोपीने चिमुरडीचा मृतदेह शेनाच्या ढिगार्याखाली लपवला. पोलिसांनी आरोपीला अवघ्या दीड तासात नराधम आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. पीडित मुलगी दुपारी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सायंकाळी 4:30 वाजता पोलिसात तक्रार दाखल होताच तत्काळ शोधमोहिम राबवण्यात आली आणि 5:15 वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला आमच्या ताब्यात द्या: या ह्रदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी थेट आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणाकडे वेळ नसेल तर आमचा न्याय आम्ही स्वत: हिसकावून घेऊ. अशी मागणी संतप्त आंदोलकांनी केली असून स्थानिकांनी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळत आरोपीला शिक्षेची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर: या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ अशा संवेदनशील घटनेत राजकारण करणे अत्यंत अयोग्य आहे. काही गोष्टींमध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे, तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच मृत्युदंडाची मागणी करण्यात येईल” असंही त्यांनी स्पष्ट केले.



Comments