top of page

महाविकास आघाडीचा कादा हामीभावाच्या मागणीसाठी चांदवडमध्ये मोर्चा, आमदार रोहित पवारांसाह महाविकास आघाडीचे नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : कांद्याला हामी भाव, विकलेल्या कांद्याला अनुदान द्या या मागणीसाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये मंगळवारी (दि.26) महाविकास आघाडीच्या वतिने मुंबई- आग्रा मार्गावर चांदवड येथे आयोजित केलेल्या कांदा मोर्चामधून रोहित पवारांसहित मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी 11:00 पासून सुरूवात झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्याने तब्बल एक तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.


महाविकास आघाडीच्या आयोजीत मोर्चाचे रुपांतर सभेत झाले, यावेळी आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली. आमदार रोहित पवार म्हणाले की, आंदोलनाला येत असलेल्या शेतकर्‍यांना पोलिसांनी अडवलं, आमच्या लोकांना तात्काळ सोडा अन्यथा महागात पडेल, हवेत गेलेल सरकार आच्यावर दर्लक्ष करत आहेत. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही मराठी माणसे, दिल्ली समोर झुकणार नाहीत. दादांना न्याय देणे या महाराष्ट्रात अवघड असेल तर सर्व सामान्यांना न्याय मिळणार नाही. शेतकर्‍यांना डिझेल मिळत नाही. गिरीश महाजन यांनी किती काळाबाजार केला ते मी स्वत: बाहेर काढणार, ऊन वार्‍याची तमा बाळगू नका आता सहन नाही केले तर पुढे कसे होणार. आता पोलिस मोठ्या प्रमाणात आले.. सरकार सर्व सामान्यांना घाबरत आहे” असंही आमदार रोहित पवार म्हणाले.


हर्षवर्धन सपकाळांची जहरी टीका: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर आरोप करत पंपतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर, विखारी टीका केली. “जोपर्यंत सरेंडर,दलिंदर पंतप्रधान पायउतार होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांचे असेच हाल होणार आहेत. हा पुरता दलिंदर असल्याचं म्हणज सपकाळ यांनी मोदींवर विखारी टीका केली, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तुमच्याकडे कुंभमेळ्यासाठी पैसा आहे पण शेतकर्‍यांसाठी नाही” असे म्हणत महायुती सरकारवर निशाना साधला.

दरम्यान, यावेळी आमदार रोहित पवारांसहीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, उद्धव ठाकरेंच्या शिवसनेचे नेते तसेच विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवणे या प्रमुख नेत्यांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतलं. चांदवड पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

Comments


bottom of page