top of page

महाविकास आघाडी सरकारच्याही ‘ढोंगी कॅप्टन’ समोर पायघड्या? दारणा धरातून 48 किलोमिटर पाईपलाइन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय

आहिल्यानगर : ज्योतिषशास्त्रज्ञच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात, एसआयटीने कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एकेेक कारनामे समोर यायला सुरूवात झाली आहे. नराधम खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थानसाठी त्यानं राजकीय नेते आणि अधिकार्‍यांना हाताशी धरून मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72 हजार शेतकर्‍यांच्या हक्काचं 39 लाख लीटर पाणी पळवण्याचं पाप केलं आहे.


नराधम खरातने शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगिचा लावला आहे. त्यासाठी राजकीय वजन वापरुन पाणी आणण्यासाठी 48 किलोमिटर पाईपालाईन टाकण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला पाठवण्यात आला. पुढे पाटबंधारे खात्याने हा प्रस्ताव गोदावरी महामंडळाला पाठवला. त्यानंतर दारणा धरातूनप मिरगावच्या शिवनिका ट्रस्टला 39 लाख लिटर पाणी देण्यासाठी जलसंपदा खात्यानं 31 जुलै 2020 रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली. आणि गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर शेती वापरासाठी 39 लाख लिटर पाणी देण्यात आलं.


दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने खरातच्या संस्थानला पाणी देण्याबाबात घेतलेल्या निर्णयावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर पाणी कुठं मुरतंय?याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बडे अधिकारी, राजकीय नेत्यांशी अभद्र युती करत शेतकर्‍यांच्या हक्काचं पाणी काळे कारनामे करणार्‍या खरातच्या संस्थानला दिलं गेलं. शेतकर्‍यांच्यां हक्काचं पाणी खरात सारख्या नराधमाला देणार्‍या अधिकारी आणि मंत्र्यावरही कारवाई करायला हवी.

Comments


bottom of page