महिलेवर दोन वर्षापासून अत्याचार, फोटो व्हायरल करताच पिडीतेचा विष प्राशान करुन आत्महत्येचा प्रयत्न
- Navnath Yewale
- Apr 12
- 2 min read

‘तुझ्याकडे ऊसतोडणीचे असलेली बाकी दे किंवा शरिरीक संबध ठेव, नसता मी तुझ्या पतीला मारून टाकेल’. ऊसतोड मजूर महिलेला त्याने दोन ते तीन वर्षापूर्वी धमकी दिली. बरंवाईट करेल म्हणून ती घाबरली. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. पण, कटाळून त्याने तिला शरीरसंबध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिचे नकोते फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. बदनामी व अत्याचाराला कंटाळून पिडीतेने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
हि घटना मंगळवारी (8 एप्रील) सकाळी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी पिडीतेच्या तक्रारीवरुन माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलिस ठाण्यात अत्यावर व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील दिंद्रूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ऊसतोड मजूर जोडपे हे अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते.
ऊसतोडणी कामातील काही रक्कम पिडीतेकडे शिल्लक राहिली होती त्या अनुषंगाने ‘तुमच्याकडे असलेले पैंसे दे अन्यथा माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव ’ म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने अत्याचार केला. त्याने फोटोही काढले. महिलेचे नकोते फोटो काढून भेटायला आली नाहीस तर सोशल मिडियावर व्हायरल करेन. अशा धमक्या तो द्यायचा त्यामुळे ती इच्हा नसताना त्याचे अत्याचार सहन करत होती. मागील दोन ते तीन वर्षापासून हे सुरू होतं.
दरम्यान, मागील सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचा रागा धरून गावातीलच सोशल मिडियावर अमोल शिनगारे याने पिडीतेच नको ते फोटो व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्याचा पिडीतेला धक्का बसला. या प्रकरणाला कंटाळून पिडीत महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खासगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत.
घटना घडताच आरोपी फरार
दिंद्रूड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक स्वप्नील भोजगुडे यांनी सोगितले की, ‘आरोपी फरार असून त्याचा सर्व मार्गाने तपास करुन शोध घेणे सुरू आहे. पोलिस यंत्रणा सर्वोतोपरी आरोपीच्या अटकेच्या प्रयत्नात आहे’.
निलम गोर्हे यांचे पोलिस अधिक्षकांना निर्देश
याप्रकरणाची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी बीडचे पोलिस अधिक्षक़ नवनित कावत यांना सखोल व तातडीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.पिडीतेला न्याय मिळावा, यासाठी सक्षम व अनुभवी सरकारी वकील नेमण्याची विनंती केली आहे. आरोपीने सावकारी पद्धतीने पिडीतेचा छळ केला असेल, तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि इतर लागू असणार्या कायद्यांनुसारही तातडीने कारवाई करावी, असेही निर्देश डॉ. गोर्हे यांनी पोलिस अधिक्षकांना दिले.
Comments