top of page

माजी उपसरपंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

वाल्मीक कराडच्या गँगकडून जीवित्वास धोका; दोन वेळा प्राणघातक हल्ल्याचा आरोप

ree

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येत वाल्मीक कराड याचा हात असल्याचा आरोप आहे. खंडणी प्रकरणातून अपहरण आणि मग निर्घुण हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी आणि त्या मागचा मास्टर माईंड कराडच होता, असा दावा बाळा बांगर यांनी काही दिवसापूर्वी केला. त्यानंतर आता आणखी एक उपसरपंचाने वाल्मीक कराड गँगने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे.


लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे आणि विधानसभेला राजेभाऊ देशमुख यांचे काम केले, या रागातून आपल्यावर कराड यांच्या गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप लिंबगावचे उपसरपंच तानाजी धुमाळ यांनी केला. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असून ‘ तुतारी’ चा प्रचार करत बजरंग सोनवणे आणि राजेभाऊ देशमुख यांना गावातून लीड मिळवून दिली होती.


याचा राग म्हणून माझ्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. आपल्या कुटुंबियांना या गुडांकडून संरक्षण मिळावे आणि वाल्मीक कराड व त्याच्या गँगवर कारवाई करावी, या मागणीसाठभ उपसरपंच तानाजी धुमाळ आणि त्यांचा मुलगा आकाश हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देत वाल्मीक कराड याच्या गुंडाने आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप धुमाळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदानात केला आहे.


आमचे कुणीही काहीही करु शकत नाही, आम्ही वाल्मीक कराडची माणस आहोत, तुझा संतोष देशमुख केल्याशिवाय राहणारनाही म्हणून आपल्यावर दोन वळा जिवघेणा हल्ला केला. मात्ररू आरोपींचे स्थानिक पोलिसांशी संगणमत असल्याने त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 9 मार्च व 25 मार्च रोजी याच आरोपींनी आपल्यावर जिवघेणा हल्ला केला.


दत्ता काळे, प्रकाश काळे, विकास काळे, सतीष काळे, राजेंद्र काळे, व नितीन काळे यांची नावे धुमाळ यांनी निवेदनात नमूद केली आहेत. पोलिसांचे पाठबळ असल्याने आरोपी कायम आपल्या घराकडे चाकू, तलवारी घेऊन येतात व धमक्या देतात. आरोपींकडून आपल्या कूटुंबीयांच्या जिविताला धोका असल्यामुळे आपल्याला संरक्षण द्यावे आणि आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी तानाजी धुमाळ आणि आकाश धुमाळ यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Comments


bottom of page