माजी पोलिस महासंचालकाचा संसयास्पद मृत्यू; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात अढळला मृतदेह
- Navnath Yewale
- Apr 20
- 1 min read

कर्नाटकातील बेंगळुरुत खळबळजनक घटना घडली आहे. माजी पोलिस महासंचालक ओप प्रकाश यांच्या हत्येची घटना घडली आहे. ओम प्रकाश यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. ओम प्रकाश 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना संशय आहे की, त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या संशयाची सूई त्यांच्या पत्नीवर आहे. घटनेवेळी बायको आणि मुलगी घरात होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, ओम प्रकाश यांची पत्नी कथित हत्या प्रकरणात मुख्य आरोपी होऊ शकते. पोलिसांना त्यांच्या बायकोला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून बारकाईने चौकशी सुरू आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.
बेंगळुरू शहर पोलिसांनी म्हटलं की, कर्नाटकातील माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश हे 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती हाती आलेली नाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं
ओम प्रकाश बेंगळुरू येथे त्यांच्या घरात राहत होते. त्यांचा रविवारी घरात मृतदेह अढळला. सुरुवातीच्या तपासात महिती समोर आली की, घटनेवेळी घरात त्यांची पत्नी आणि मुलगी होती. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करुन ओम प्रकाश यांच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी सांगितलं की, ओम प्रकाश यांचा मृतदेह घरात पडलेला होता. घटनेवळी पत्नी आणि मुलगी घरात होत्या. पोलिसांकडून त्यांच्या पत्नीची चौकशी केली जात आहे. ओम प्रकाश यांच्या हत्येमागे घरगुती वादाचं कराण असल्याचं बोललं जात आहे.
Commentaires