top of page

मुंबईत पुन्हा बॉम्ब हल्ला होणार? पोलसांचा हाय अलर्ट




भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभुमिवर, मुंबईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक मेल आला आहे. हा धमकीचा मेल मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला आहे. एका अज्ञात ईमेल पत्यावरुन मुुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर पोलिस हाय अलर्टवर आहेत.


मुुंबई पोलिसांना पाठवलेल्या मेलमध्ये महाराष्ट्राच्या राजधानीत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की “ आज, उद्या किंवा दोन दिवसांत मोठा स्फोट” होऊ शकतो. या धमकीच्या मेल मध्ये संभाव्य स्फोटाची नेमकी वेळ आणि ठिकाण नमूद केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी मुंबईतील प्रत्येक प्रभागात सुरक्षा वाढवली आहे.

पोलिसांच्या ईमेल पत्यावर धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबईच्या सायबर टीमने ईमेलच्या आयपी पत्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून ईमेल पाठवणार्‍याची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर पकडता येईल. मुंबई पोलिसांना अशा धमकीचे ईमेल येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मुंबईतील हाय प्रोफाईल लोकांच्या घरांवर आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचच्या धमकीचे ईमेल आले आहेत. मात्र या सर्व धमक्या खोट्या ठरल्या, असे असूनही दरवेळी प्रमाणे, याहीवेही पोलिस या धमकीच्या मेलला गांभीर्याने घेत आहेत. नियंत्रण कक्षाला ताबडतोब धोक्याची माहिती देण्यात आली, ज्यामुळे तपास सुरू होताच संपूर्ण शहर सतर्क झाले.


मे महिन्याच्या सुरुवातील, अंधेरी पूर्वेतील एका फ्लॅटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करणार्‍या फोन कॉलद्वारे अशीच धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी ताबडतोब प्रतिसाद दिला, पण तो कॉल एका मानसिक आजारी माणासाने खोटा असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे अटक न करण्याचा निर्णय घेण्यात आला.


अशा धमक्यांच्या वारंवार घडणार्‍या घटनांमुळे शहर धोक्यात आले आहे, परंतु मुंबई पोलिस सतर्क आहेत. आतापर्यंतच्या प्रत्येक धमकीने, जरी ती निराधार असली तरी, मुंबईतील नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिसांना उच्च सतर्कतेवर ठेवले आहे.

Comments


bottom of page