top of page

मुंबईत रेल्वे अपघात; धावत्या लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू



मुंबईत लोकल रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. कसार्‍याहून सीएसएमटीकडे जाणार्‍या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी सहा प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, मुंब्रा स्थानकापासून मार्गस्थ होत असताना लोकल रेल्वे च्या वेळेत दूसर्‍या ट्रॅकवरुन पुष्पक एक्स्प्रेस सीएसएमटीकहून कसाराकडे जात होती याच वेळेत अपघात झाल्याची माहिती आहे.


आज (9 जून) सकाळी 9:00 वाजताच्या सुारास कसार्‍याहून सीएसएमटीकडे जाणार्‍या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी एक्सप्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, असंही सांगण्यात येत आहे. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजी महराज टर्मिनलवरून पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. तर कसार्‍याहून सीएसएमटीकडे लोकल जात होती. या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल गेला.


घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. दरम्यान, अपघातानंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही तर रुळाच्या बाजूला पडले, असं लीला यांनी सांगितलं आहे.


रेल्वे प्रशासनाचा खुलासा :

“ पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसार्‍याला जाणार्‍या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही. कसार्‍याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्स्प्रेस बाजूनेच जात होत्या. त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले, हे समजू शकलेलं नाही” अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


धावत्या रेल्वेतून आणखी काही प्रवासी खाली पडल्याची माहिती मिळतेय. नेमकं काय घडलं होतं, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समोर आलं आहे.


“ ही घटना नेमकी कशी घडली, त्यामागचं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न नेहमीच सरकारकडून केला जात आहे. परंतु प्रवाशांची, नागरिकांचीही जबाबदारी असते. हे कशामुळे झालं, हे समोर आल्यानंतर सविस्तर बोलता येईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. भाजपचे आमदार संजय केळकर याप्रकरणी म्हणाले,” ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद आहे. हेच पाच प्रवासी नेमके कसे पडले, डब्यात खूप गर्दी होती का, हे तपासणं गरजेचं आहे . परंतु प्रवाशांना सुरक्षा, सुविधा आणि सेवा देण्याचं काम पूर्ण ताकदीने प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. ही घटना का घडली, याची चौकशी झाली पाहिजे. यात प्रशासनाच्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे.


रेल्वे प्रशासनाचा निर्णय :

मध्ये रेल्वेमार्गावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असेल, सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल. कल्याण कसरापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित आहे. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईन पर्यंत अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला अहो त्याच बरोबर सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन- आऊट टाईम ठेवण्याचा सल्ला जबाबदार प्रशासनाला दिला आहे .

댓글


bottom of page