top of page

मुंबई बॉम्बने उडवून देऊ; पोलिस नियंत्रण कक्षाला दाऊद इब्राहिमकडून धमकीचा कॉल




मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे, ज्यामध्ये फोन करणार्‍या व्यक्तीने स्वत:ची ओळख डी कंपणीतील सदस्य म्हणून करुन दिली आहे. डी कंपनीचे नेतृत्व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतो. त्यामुळेच एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे.


फोन करणार्‍याने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला आहे आणि स्वत:ला डी कंपनीचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिस तात्काळ सक्रिय झाले आणि बॉम्ब पथकाला माहिती देण्यात आली. चौकशी करण्यात आली, पण काहीही संशयास्पद आढळले नाही.

पोलिसांनी फोन करणार्‍याचे ठिकाण शोधले आणि मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून फोन करणार्‍याला ताब्यात घेतले.


मंगळवारी पहाटे 2:30 च्या सुमारास फोन अला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये आरोपीने दावा केला होता की, “मी डी (दाऊद) टोळीचा आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट होतील ” यानंतर त्याने अचानक फोन डिस्कनेक्ट केला. कॉल करणार्‍या व्यक्तीच्या या कॉलनंतर, वरिष्ठ अधिकार्‍यांना तात्काळ माहिती देण्यात आली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली.


धमकी गांभीर्याने घेत, पोलिसांनी ताबडतोब फोन करणार्‍याचा शोध घेतला. आणि त्याला बोरिवली परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीचे नांव सूरज जाधव असे आहे, तो बोरिवलीचा रहिवाशी आहे. पोलिस अधिकार्‍यांनी उघड केले की, जाधव याने काही महिन्यापूर्वी असाच एक खोटा फोन केला होता, ज्यामध्ये मुंबईत बॉम्बस्—फोटाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी त्याला अटकही झाली.

Comentarios


bottom of page