मुंबई भोवती समुद्रात नौदलाचा ताफा तैनात; माच्छिमार बोटींसह कर्मचार्यांची तपासणी
- Navnath Yewale
- May 11
- 2 min read

भारत आणि पाकिस्तान तणावाची स्थिती दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात असली तरी पाकिस्तानच्या कुरापतीसह मागील काळातील दहशवाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. समुद्र आणि हवाई मार्गाने प्रवेशाचे पर्याय असल्याचे सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत, त्यामुळे भारतीय नौदलाने ताफा तैनात केला आहे. याचबरोबर नौदलाने मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचार्यांचीही तपासणी व नोंदणी सुरू केली आहे.
“ मुंबईच्या किनार्याभोवतली पूर्णपणे सतर्कता आहे, येथे उत्तर आणि अरबी नौदलाला तैनात करण्यात आले आहे. मच्छिमार बोटी आणि त्यांच्या कर्मचार्यांवरही देखरेख वाढवण्यात आली आहे. त्यांना सतर्क राहण्यास आणि समुद्रात कोणत्याही असामान्य हालचाली आढल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितले आहे” असे नाव न सांगण्याच्या अटीवर नौदलाच्या एका अधिकार्याने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
2008 च्या दहशवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर, सर्व बोटी आणि त्यांच्या कर्मचार्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची दररोज तपासणी करणे खूप महत्वाचे आहे, असे या अधिकार्याने पुढे म्हटले आहे. काही दिवसापूर्वी नौदलाच्या प्रमुखांची मत्स्यव्यवसाय आयुक्तांसोबत बैठक झाली होती. मासेमारी अधिकार्यांना बोटींची नोंद, तपासणी आणि बोटींची संख्या, त्यांचे मालक आणि बोटीवरील कर्मचार्यांची माहिती दररोज जाहिर करण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर मच्छिमारांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” या असे अधिकार्याने सांगितले.
2008 मध्ये मुंबई दहशवादी हल्ला झाला होता. अजमल कसाब आणि पाकिस्तानातील त्याच्या इतर नऊ साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि शहर, देशाला हादवून टाकणारा दहशतवादी हल्ला केला होता. “ नौदल कोणताही धोका पत्करू शकत नाही आणि म्हणूनच ते सर्व सथानिक बोटींवर लक्ष ठेवून आहेत. याचबरोबर दररोज त्यांच्या नोंदी आणि तपासणी करत आहेत. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनेचा धोका नेहमीच असतो, म्हणूनच बोटींची तपासणी आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत” असेही अधिकार्याने स्पष्ट केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्धवस्त केले. यानंतर पाकिस्तानने सातत्याने भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर ड्रोनसह विविध माध्यमांतून हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परतावून लावले. दरम्यान, काल दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामास मान्यता दिली आहे.
Comments