top of page

मुख्यमंत्री फडणवीस यांना उच्च न्यायालयाचे समन्स; काय आहे प्रकरण?




महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावले आहे . नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी 2024 मध्ये झालेल्या निवडणूकीतील विजयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे.


या वर्षीच्या सुरुवातीला काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणूकीत विजयी झालेे. या प्रक्रियेला याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. निवडणूकीत प्रतिक्रयात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा वापर केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून वियी झालेले उमेदवार मोहन मते आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार बंटी भांगडीया यांना सुद्धा न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या (8 मे) रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.


2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूका झाल्या . या निवडणूकीत नागपूर दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी राजकीय आखाड्यात दंड थोपाटले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले. तर, गुडधे यांचा 39 हजार 710 मतांच्या फरकाने पराभव झाला. या निवडणूकीनंतर फडणवीस यांच्या विजयाला गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले.


भ्रष्ट पद्धतीने आणि अनेक प्रक्रियांमधील त्रुटी ठेवून ही निवडणूक जिंकल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणी खंडपीठाने फडणवीस यांना समन्स बजावत त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. त्यांना 8 मे रोजी उत्तर सादर करावे लागणार आहे, अशी माहिती गुडधे यांच्या वकिलांनी पीटीआयला दिली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान अनेक अनिवार्य असलेले नियम पाळले गेलेले नाहीत, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Comments


bottom of page