मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात घुसून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न !
- Navnath Yewale
- Jun 20
- 1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस शुक्रवारी (दि.20) जळगाव जिल्हा दौर्यावर होते. धरणगाव येथील क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच, ताफ्यामध्ये घुसून एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी दहा वाजात मुंबईहून जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा धरणगावकडे महामार्गाने रवाना झाला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर जळगांव काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील उर्जा विभागाच्या कामांचे कंत्राट घेतले होते. त्यावेळी चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याची चोरी झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले त्यातून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
चोरीच्या तपासाचे काम सोपविलेल्या पोलिस कर्मचार्यांनी ही आपल्याला न्याय दिला नाही. त्यांच्या विषयी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. सबंधित पोलिस कर्मचार्यांच्या रुपाने दुसरा ‘वाल्मिक कराड’ जळगाव जिल्ह्यात तयार झाला आहे, असा आरोप संजय वराडे यांनी केला.
शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संजय वराडे यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या घटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्या प्रसंगी चांगलाच गोंधळ उडाला.
Comentários