मुद्याचं समर्थण ...पण गुद्यावर चौफेर प्रहार
- Navnath Yewale
- Jul 9
- 2 min read
शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं, ती माझी प्रतिक्रिया होती, तसुभरही पश्चाताप नाही - आमदार संजय गायकवाड

आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीमध्ये दुर्गंधीयुक्त जेवन देत असल्याचा सर्रास चालू असणारा प्रकार मंगळवारी (8 जूलै) रोजी रात्री बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेला राडा ऐरणीवर आला. आमदार गायकवाड यांनी शिळी डाळ खायला देणार्या कन्टीनमधील कर्मचार्याला गुद्या लावत मारहाण केली. “ दिलेलं जेवन निकृष्ट नाही, तर सडलेलं होतं, त्यानंतरच माझी तेथील कर्मचार्यांस झालेली मारहाण ही माझी प्रतिक्रीया होती” असे आमदार गायकवाड म्हणाले.
दरम्यान, अगदी टॉवेल, बनियानवर येऊन डाळ बनविणार्या कर्मचार्याला आमदार गायकवाड यांनी तोंडावर गुद्दे लावून मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला विधानसभेत धारेवर धरले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, झालेला प्रकार निषेधार्ह असून, डाळ शिळी होती तर तक्रार कारायची होती. अशा प्रकारच्या मारहाणीमुळे लोकांमध्ये आमदाराची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करावी” अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. “ लोकप्रतिनिधींनी अशी मारहाण करणे अयोग्यच. सन्मानीय अध्यक्ष ह्यासंदर्भात आवश्यक ती कारवाई करतील” असेही फडणवीस म्हणाले.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांनीही संजय गायकवाड यांना धारेवर धरले तर खासदार संजय राऊत यांनी मारहाण प्रकरणावरुन राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरले. “ जर डाळ खराब असेल तर त्याला जाबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये गोर-गरिबांच्या घरामध्ये आदिवासी पा÷यावर मिळते. मोदी जे काही फुकट धान्य वाटतायेत त्यांची क्वालिटी पहा. फक्त आमदारांना 50 कोटी मिळाले आहेत, ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच. पण टॉवेलवर मारहाण करायची का? असा संतप्त सवाल खासदार राऊत यांनी केला.
आमदार संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी 30 ते 35 वर्षापासून आकाशवाणी कॅन्टीनमध्ये जेवतो आहे. मंगळवारी रात्री 10:00 वाजता मी कॅन्टीनमधून रोजच्याप्रमाणे दोन चपाती, डाळ, राईस अशी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यांनतर एक घास खाल्ला आणि जेवन खराब वाटलं. दुसरा घास खाल्यानंतर माझी उलटी झाली. उलटी झाल्यानंतर मी जसा होतो तसाच कॅन्टीनमध्ये गेलो आणि कॅन्टीनमधील कर्मचार्याला याबाबत विचारणा केली, हे जेवन कोणी दिलं? त्या लोकांना बोलवा असे सांगितले. तिथे बसलेल्या मॅनेजरलाही दिलेली डाळ दाखवली.
कॅन्टीनमध्ये जेवणार्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवन निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवन असल्याचे सांगितले आणि त्यांनतर आलेली ती माझी प्रतिक्रिया होती. विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात, पण मला वाटते सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जेवतात. सगळ्या जाती-धर्माचे लोक तिथे जेवतात. हा तीस वर्षापासूनचा कंत्राटदार त्या ठिकाणचा आहे. त्यांचे किचन अतिशय घाण आहे. त्यांच्या किचनमध्ये उंदीर फिरतात. त्यांनी आम्हला जेवन चक्क सडलेलं दिलं होतं. त्याला मी अनेकवेळा समजून सांगितले. जेवन तू चांगले देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून सांगितले. तरी त्याला समजत नसेलतर मी त्याला माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिले आणि मला तयचा काहीही पश्चाताप झालेला नाही. असे आमदार संजय गायकवाड यांनी ठणकावून सांगितले. मला जतर कुणी विष खाऊ घालत असेल तरख मी काय त्याची पूजा करू का? बाळासाहेबांनी आम्हला हे शिकवलेलं नाही. शिवसेनेच्या स्टाईलनेच मी कॅन्टीनमध्ये प्रतिक्रिया दिली त्याचा मला पश्चाताप नाही.. असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.



Comments