मुलाने वडिलांचा मृतदेह, दोन वर्षे घरातच ठेवला लपवून; अंत्यविधी केलाच नाही, धक्कादायक कारण आल समोर
- Navnath Yewale
- Apr 28
- 1 min read

अंत्यसंस्कार हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे असं म्हटले जाते. माणूस अनोळखी व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतो कारण त्याला मोक्ष मिळतो अशी धारणा असते. पण जपानमध्ये एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. इथे एका मुलाने त्याच्या वडिलांचा मृत्यू जगापासून लपवून ठेवला कारण त्याच्याकडे त्याच्या अंतसंस्कारावर खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. पोलिसांच्या तपासात वेगळेच सत्य बाहेर आले. पोलिसांनी त्याला अटक केली. वडिलांच्या पेन्शनमध्ये गैरव्यवहार केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध खटला सुरू आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार 56 वर्षीय नोबुहिको सुझूकीने गेल्या आठवड्यापासून आपले रेस्टॉरंट उघडले नाही तेव्हा त्याच्या कृती उघडकीस आल्या. यामुळे शेजारी काळजीत पडले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी कुलूप तोडून आत पाहीले तेव्हा त्यांना कपाटात सुझुकीच्या वडिलांचा सांगाडा आढळला.
सुझुकीला याची बातमी कळताच तोही तिथे पोहोचला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. यावर सुझुकीने सांगितले की, त्याच्या वडिलांचे 2023 मध्ये निधन झाले होते. ते 86 वर्षांचे होते. सुझुकीने सांगितले की मी त्या दिवशी माझ्या वडिलांना घरी एकटे साडले होते, मी परत आले तेव्हा त्यांचे निधन झाले होते. माझ्याकडे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी त्यांचा मृतदेह कपाट ठेवला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुझुकीला सुरुवातील आपल्या चुकीचा पश्चाताप झाला पण लवकरच त्याने मृत्यूसाठी आपल्या वडिलांना जबाबदार धरले. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या वडिलांच्या पेन्शनच्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.
Comments