top of page

मोठी बातमी; मेहूल चोक्सीला अटक, बेल्जियमधून भारतात आणणार

पीएनबी घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी



मेहूल चोक्सी याने पंजब नॅशनल बँकेचा13,500 कोटी रुपयांचा घटोळा केला होता. अटकेपासून बचावासाठी तो भारतातून बेल्जियमध्ये फरार झाला होता. तो तिथे त्याची पत्नी प्रिती चोक्सी सोबत अँटवर्पमध्ये राहत होता.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी व हिरे व्यापारी मेहूल चोक्सीला बेल्जियमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजंसीच्या विनंतीवरुन चोक्सीला अटक झाली. केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने बेल्जियम सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर 65 वर्षीय मेहूल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली. तो आता तुरुंगात आहे.


पत्नीसह बेल्जिमध्ये राहत होता.

मेहूल चोक्सी याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्झियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियमध्ये एफ रेसिडेन्सी कार्ड आहे. मेहूल चोक्सीला अ़टक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. या बाबत एका राष्ट्रीय वृत्तात म्हटले आह कीे, मुंबई न्यायालयाने 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते.



काय आहे प्रकरण

पीएनबीमधील 13,850 कोटी रुपये फसवणूक प्रकरणात मेहूल चोक्सीवर सीबीआय आणि इडीकडून खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चोक्सीचा पुतण्या निरव मोदीसुद्धा आरोपी आहे. तो लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. मेहूल चोक्सी 2018 मध्ये त्याचा पुतन्या निरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच हे दोघे पळून गेले होते. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा घोटाळा होता.


मेहूल चोक्सीला यापूर्वीही अटक

मेहूल चोक्सीला यापूर्वी 2021 मध्ये अटक झाली होती, तेव्हा तो क्यूबाला जात होता. त्यावेळी त्याला डोमिनिकामध्ये पकडण्यात आले होते. यानंतर मेहूलने म्हटले होते की, राजकीय कट रचल्यामुळे हे खटले त्याच्याविरुद्ध चालवले जात आहेत. ईडीने भारतातील त्याच्या बेकायदेशीर मालमत्ता जप्त केल्या आहेत. 2018 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 2018 मध्ये ईडीने चोक्सीच्या 1,217 कोटी रुपयांच्या 41 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या मालमत्तामध्ये मुंबईतल्या आलिशान भागातील दोन प्लॅट, कोलकत्तामधील एक मॉल, मुंबई-गोवा महामार्गावरील 27 एक्कर जमिनीचा समावेश आहे.

Komentarze


bottom of page