top of page

मोर्चासाठी मनसेचा गणिमी कावा; मराठी -अमराठी वादाचे विधानभवनात पडसाद


विरोधकांचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

ree


व्यापार्‍यास मारहाण प्रकरणी निषेधार्थ अमराठी व्यापार्‍यांनी मोर्चा काढला होता. प्रत्यूत्तरादाखल मनसेकडून मराठी माणसाच्या समर्थनार्थ आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मिरा भाईंदर येथे आयोजीत मोर्चाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाप्रमुख आशिष जाधव यांना भल्या पहाट पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोर्चापूर्वीच धरपकड सुरू झाल्याने कार्यकर्त्यांसह समान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि मिरा रोडवर सकाळी कार्यकर्ते गोळा झाले. मार्चा सुरू होण्यापूर्वीच पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करत ताब्यात घेतले. दुपार नंतर सर्व स्थानबद्ध केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोडून दिल्या नंतर मोर्चाला सुरुवात झाली यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक विधानभवनातून सहभागी झाले. पण आक्रमक आंदोलनकर्त्यांनी मंत्री सरनाईकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेन बाटली फेकण्यात आली.

ree

मराठीच्या समर्थनार्थ मनसेच्या मोर्चास पोलीसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी मिरा भाईंदर येथे जमाबंदीचे आदेश लागू केले. अमराठी व्यापार्‍यांच्या मोर्चाला परवानगी आणि मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाही म्हणत मिरा रोडवर रोषाने कार्यकर्ते सामान्य नागरीक एकवटले. दरम्यान मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलीसांनी कार्यकर्ते,आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने सत्ताधारी महायुती सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजीसह नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सरकारवर हल्लाबोल केला. अमराठी व्यापार्‍यांना एक न्याय आणि मराठी माणसांना एक न्याय सरकारचा असा दुट्प्पी पणा मराठी भाषीकांवर अन्याय करणारा असल्याच्या भावना उमटू लागल्या. त्यानंतर दुपार नंतर पोलीसांनी स्थानबद्ध केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोडून दिले. त्यामुळे मिरा भाईदर येथूनच मोर्चाला सुरुवात झाली.



मराठीमाणसाच्या समर्थनार्थ मंत्री प्रताप सरनाईक थेट विधानभवनातून मोर्चात सहभागी होण्यासाठी मोर्चास्थळावर आले. याच दरम्यान संतप्त आंदोलकांनी ‘पंन्नास खोके एकदम ओके’ च्या घोषणा देत मंत्री सरनाईक यांच्या दिशेने बाटली भिरकावली. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक लक्षात घेता मंत्री सरनाईक यांनी घटनास्थाळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, पोलीसांनी एका पक्षाचं काम करू नये, अमराठीच्या आंदोलनाला एक न्याय आणि मराठीच्या समर्थनार्थ आंदोलनाला एक न्याय चालणार नसल्याचंही मंत्री सरनाईक यांनी ठणकावून सांगितलं. प्रत्यक्षात मंत्री सरनाईक यांचा अंगुली निर्देश हा मु÷ख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होता. सत्तेत असतानाही केवळ मराठीम्हणून मी मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. मला कल्पना होती आंदोलनकर्ते माझ्याशी कशी वागणार पण केवळ मी तिथे मराठी म्हणून गेलो होतो अशा प्रतिक्रिया मंत्री सरनाईक यांनी दिल्या. मिरा भाईंदर प्रकणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायंकाळी शिवतिर्थावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला:

व्यापारी मारहाण प्रकरणी निषेधार्थ अमराठींच्या मोर्चा आणि बंदसाइी पोलीस बळाचा वापर करण्यात आला नाही. मराठीच्या समर्थनार्थ आयोजीत मोर्चात मात्र पोलीस बळाचा वापर करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्या घेतल्याने विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मोर्चाला परवानगी होती का? शिवाय, व्यापार्‍यांच्या मोर्चाला परवानगी होती का? असेल तर मराठी समर्थनार्थच्या आजच्या मोर्चाला का देण्यात आली नाही? नसेल तर व्यापार्‍यांच्या मोर्चात पोलीस बळांचा वापर का झाला नाही? आजच्या मोर्चासाठीच पोलीस बळांचा वापर का करावा लागला? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळातून पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments


bottom of page