रमीचा डाव कोकाटेंचा ‘पत्ता’ कट करणार ?
- Navnath Yewale
- Jul 21
- 1 min read

राज्याचे कृष÷ीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसले. तसा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या एका विधानाने आता कोकाटे यांचा राजीनाम घेतला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत तुमचं काय मत आहे, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
तसेच तटकरे लातून दौर्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या टेबलवर पत्ते टाकले होते तसेच कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. या घटनेनंतर छावा संघटनेच्या संबंधित पदाकिधार्याला राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर छावा संघटनेच्या संबंधित पदाधिकार्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. मारहाण करणार्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे देखील होते. ते मारहाण करातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्यावरही मोठी कारवाई करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे तटकरे म्हणाले.
आणखी एक राजीनामा पडणार का?
आता तटकरे यांच्या सूचक विधानानुसार माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हे ठरवले जाईल. मात्र तटकरेंच्या विधानानंतर आता भविष्यात आणखी एक राजीनामा पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



Comments