top of page

रविंद्र जडेजाने रचला नवा इतिहास




रविंद्र जडेजा हा मैदानावर त्याच्या चपळाई आणि वेगवानपणासाठी ओळखला जातो. अष्टपैलू क्षमतांनी परिपूर्ण असलेला हा खेळाडू आपल्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने विरोधी संघावर कहर करण्यात पटाईत आहे. जडेजाने त्याच्या या गुणांमुळे एक नवा इतिहास रचला आहे.


आयसीसी कसोटी क्रमवारीच्या इतिहासात जडेजा सर्वात जास्त काळ नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. या ठिकाणी इतर अनेक खेळाडू आले आणि गेले. पण जडेजा बराच काळ नंबर-वन वरुन हलला नाही, त्याने एक नविन इतिहास रचला आहे.


त्याने 1151 दिवस कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी जडेजाने शानदार कामगिरी केली आणि 29.27 च्या सरासरीने 527 धावा केल्या. त्याने24.29 च्या प्रभावी सरासरीने 48 विकेट्सही घेतल्या. या खेळामुळे तो क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

या कामगिरीने जडेजाने जगातील अनेक मोठ्या खेळाडूंना मागे टाकले. जॅक कॅलिस, कपिल देव, इम्रान खान सारखे खेळाडू त्यांच्या अद्भुत अष्टपैलू खेळाडू होते. 2022 .मध्ये जडेजा क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला पराभूत करण्यात येश मिळवले.


आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत जडेजा 400 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्या विक्रमामुळे त्याला आधुनिक क्रिकेटच्या नायकांच्या यादीत आणखी स्थान मिळाले आणि त्याच्या कारकिर्दीला एक नवीन पंख मिळाला आहे.


36 वर्षाचा असूनही, त्याची तंदुरुस्ती उत्कृष्ट आहे. थ्रो थेट सीमारेषेवरुन येतो आणि त्याच्यासमोर एकेरीचे डबलमध्ये रुपांतर धाडस कोणाकडेही नसते. दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Comments


bottom of page