top of page

रवींद्र धंगेकरांची शिवसेना (शिंदे)पक्षातून हाकलपट्टी होणार?

ree

पुण्यातील स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा आहे. हाकलपट्टी होणार असल्याची चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रियास दिली आहे.


याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर म्हणून मी बोललेच पाहिजे. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. गुन्हेगारी असेल, सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांनाच जाब विचारला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना थोडा जाब विचारता येईल.


मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली. त्यात बिल्डरांसोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला. पुणेकरांना याचा विचार करावा लागेल. देव धर्म जिथे गहाण ठेवले जात आहेत, तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाहीत याची मला जाणीव आहे असंही धंगेकर म्हणाले.


मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतलं नाही. याउलट भाजप नेतेच बेछुढपणे माझ्यावर आरोप करत आहेत. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिलीं आहेत. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करणार. प्रत्येक वेळी युती धर्म आड येत असेल तर मी शिंदेंशी बोलेन. शिवसेना असेल, भाजपा असेल तर चुका दाखवणे त्यात काही गैर नाही.


माझ्यावर कावाईबाबत माहिती नाही. मी माझी बाजू मांडेन, असंही धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असं म्हटलं आहे. पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणार्‍या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नसल्याचं धंगेकर म्हणाले.

Comments


bottom of page