रशियाचा युक्रेनवर प्राणघातक ड्रोन हल्ला; अनेक भागांना केले लक्ष्य!
- Navnath Yewale
- Apr 27
- 1 min read

रशियाने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये जलद हल्ले केले आहेत. रशियाने आपल्या हल्ल्यांनी युक्रेनच्या अनेक भागांना लक्ष्य केले आहे. रविवारी अधिकार्यांनी या हल्ल्यांबद्दल माहिती दिली. हल्ल्याच्या एक दिवस आधी, अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध संपवण्याच्या हेतूवर शंका व्यक्त केली होती.
रशियाने आक्रमण सुरूच ठेवले...
निप्रोपेट्रोव्हस्कचे गव्हर्नर सेर्ही लिसाक म्हणाले की, प्रदेशातील पावलोहड शहरावर सलग तिसर्या रात्री हल्ला झाला. ताज्या हल्ल्यांमध्ये एका पुरुषाचा मृत्यू झाला आणि एका 14 वर्षांच्या मुलीला दुखापत झाली. रशियाने कुर्स्क प्रदेशातील उर्वरित भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याचा दावा केल्यानंतर, काही तासांतच हे हल्ले झाले.
युक्रेनियन हवाई दलाने काय म्हटले?
युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, रशियाने ताज्या हल्ल्यांसाठी 149 ड्रोन वापरले, त्यापैकी 57 ड्रोन नष्ट करण्यात आले. स्थानिक अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोन हल्ल्यात ओडेसा प्रदेश आणि झिटोमिर शहरात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे.
रशियाने युक्रेनियन ड्रोन पाडला.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की, त्यांनी ब्रायन्स्कच्या सीमावर्ती भागात पाच युक्रेनियन ड्रोन नष्ट केले आहेत. क्रिमियन द्विपकल्पात तीन युक्रेनियन ड्रोन देखील नष्ट करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.
रशियाचे सतत हल्ले
रशियाने अलीकडेच युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. रशियाने केलेल्या या हल्ल्यांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 6 मुलांसह 70 जण जखमी झाले. एवढेच नाही, तर रशियन आर्मी जनरल स्टाफ चीप व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी पुष्टी केली आहे की, उत्तर कोरियाच्या सैनिकांनी रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनियन सैनिकांविरुद्ध लढा दिला आहे.
コメント