top of page

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; यंदाही पोरांपेक्षा पोरीच सरस, कोकण विभाग प्रथम तर नागपूर विभाग तळाला.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकालाची गुणपत्रीका पाहता आली. विद्यार्थी, पालकांनी मंडळाच्या अधिकृत संकतेस्थळावर गुणपत्रीका पाहिली.


यंदा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. त्यानुसार यंदा कोकण विभाग अव्वल असून नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.


विभागनिहाय निकालाची टक्केवारी

पुणे : 94.81 टक्के नागपूर :90.78 ट़क्के, छत्रपती संभाजीनगर 92.82 टक्के मुंबई 96.84 टक्के, कोल्हापूर: 96.78 टक्के, अमरावती : 92.95 टक्के, नाशिक : 93.04 टक्के, लातुर 92.77 टक्के, कोकण 99.82 टक्के

दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकून 1558020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1546579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 1455433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.


या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकून 28,512 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे.


तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24376 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23956 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.


खासगी व पुनर्परिक्षार्थी मिस एकूण 1610108 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 1598553 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 1487399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे.


दिव्यांग विद्यार्थी: एकूण विभागीय परीक्षामंडळामधून 9673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27 आहे.


दरम्यान सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (98.82%) सार्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (90.78%) आहे.

Comentários


bottom of page