राज्यातील एकमेव गावं जिथे ब्रम्हचारी हनुमंताचा महिला रथओढतात
- Navnath Yewale
- Apr 12
- 1 min read

बोला, रामभक्त हनुमान की जय... हा जयघोष देशीरात घुमला. हनुमान जयंती निमित्त राज्यातली हनुमान मंदिरं सजली आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी मंदिरात पहायला मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातही चैंतन्याचं आणि भक्तिमय वातावरण होतं. इथं एक अनोखी परंपरा आहे. ब्रम्हचारी असणार्या हनुमताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो.
ब्रिटीशांनी या रथाला बंदी घातली. मात्र , ही बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली ही रथयात्रा काढली आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. 1929 पासून आजतागायत रथ ओढण्याची परंपरा कायम ज्याकाळात देशात अस्पृश्यता होती..पुरुष स़्त्री समानता नव्हती, ब्रिटीशांकडून अत्याचार केले जात होते त्याकाळापासून संगमनेरच्या महिलांनी आपली ताकद आणि एकजूट दाखवून हा रथ ओढला होता.
या रथयात्रेदरम्यान पोलिसांनाही विशेष मान असतो. पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. कित्येक वर्षापासून महिला या ठिकाणी रथ ओढतात. लाकडापासून बनवलेल्या या रथाला श्री बजरंगबली विजय रथ म्हणून संबोधलं जातं. राज्यातल्या काही भागात आजही मारूती मंदिरात जायला महिलांना बदी असताना ही हनुमान रथ ओढण्याची परंपरा अनुकरणीय आहे.
Comments