राज्यातील मद्यपिंच्या दिमतीला आता मोहफुलांचा लौंकिक
- Navnath Yewale
- Apr 8
- 1 min read
Updated: Apr 9

तुम्ही आतापर्यंत वाईनचे अनेक प्रकार पाहिले असतील. मद्यप्रेमींनी तर वेगवेगळ्या चवीच्या वाईन पिऊनही पाहिल्या असतील. काळी द्राक्ष, हिरव्या द्राक्षांच्या वाईनचे एवढेच काय तर धान्यापासून तयार होणार्या वाईनचे ही प्रकार पहायला मिळतात. पण या वाईनच्या भाऊगर्दीत आता मराठमोळ्या वाईनचा एक वेगळा लौंकिक नुकताच येऊ घातला आहे.
हा लौंकिक आहे मोहफुलाच्या वाईनचा. राज्य सरकारच्या शबरी विकास महामंडळ आणि सॅम ऍग्रो कंपणीच्या संयुक्त विद्यमाने मोहफुलाची वाईन तयार करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणते या वाईनमध्ये अल्कहोलचं प्रमाण 34 टक्यांवर न ठेवता 12 टक्यांवर आणण्यात आलं आहे. शिवाय मोहफुलाचा जो उग्र गंध आहे तोही कमी करण्यात आला आहे.
आदिवासी भागातील मोहा फुलांची झाडे फुलली की जणू आदिवासींसाठी कल्पवृक्ष फुलतो. देवा समान पुजणार्या या वृक्षाला अदिवासी बांधव अनन्यासाधारण महत्व देातात याच फुलांपासून बिस्किटांपासून ते वाईन पर्यत वेगवेगळे खाद्यपदार्थ शबरी विकास महामंडळाने तयार केले आहेत. आता महामंडळाच्या संकेस्थळावर या सर्व वस्तु उपलब्ध असणार आहेत.
मोहफुलाचा वापर हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी केला जात होता. मोहफुलांना बाजारात फारशी किंमतही मिळत नाही. पण मोहफुलाच्या वाईनमुळं फुलं गाळा करणार्या आदिवासींना रोजगाराचं एक हक्काचं साधन मिळाणार आहे. शिवाय मोहफुलाला प्रतिष्ठाही मिळणार आहे. शबरी विकास महामंडळानं आतापर्यंत मोहफुलाची बिस्कीटं लाडू बनवण्याचा प्रयोग केला होता. पण यावेळी मोहफुलाची वाईन तयार करण्याचा प्रकल्प अतिशय वेगहा मानला जात आहे.
द्राक्षाची वाईन पिणारा एक वर्ग आहे. उच्चवर्गीयांमध्येही मोहफुलाची वाईन लोकप्रियता निर्माण करील अशी अपेक्षा आहे. मोहफुलाच्या वाईननं उच्चवर्गीयांत स्थान मिळवल्यास वाईन इंडस्ट्रीलाही त्याचा मोठा फायदा होईल. तसंच मोहफुलं गोळा करणार्या आदिवासींनाही त्याच्या फायद्याचा गोडवा चाखता येणार आहे.
Comments