राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
- Navnath Yewale
- Jun 27
- 2 min read

महायुती सरकारने मागील काही महिन्यांपासून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. गृहविभागाने शुक्रवारी (27 जून) राज्यभरातील 51 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये काहींना प्रमोशन तर काहींना डिमोशनवर पदस्थापना देण्यात आल्या आहेत. शिवाय पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकार्यांनाही पदस्थापना देण्यात आल्या आहेत. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात उचलबांगडी करण्यात आलेल्या अविनाश बारगळ यांना लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून पदस्थापना देण्या आली आहे.
राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्हा प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले आहेत. यामध्ये पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उप महानिरिक्षक अशा महत्वांच्या पदांवरील अधिकार्यांचा समावेश आहे. या बदली प्रक्रियेत पुणे जिल्ह्यासाठी तीन नवे आयपीएस मिळाले आहेत.
राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या बदली आदेशामध्ये शस्त्र निरीक्षक शाखा पुणे च्या पोलीस अधिक्षक तेजस्विनी बाहासाहेब सातपुते यांना राज्य राखीव पोलिस बल गट क्र. पुणे पदस्थापना देण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक ,महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची बदली पोलीस अधिक्षक लातूर, अश्विनी सानप पोलिस अधिक्षक महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, मुंबई यांची पदस्थापना पोलिस अधिक्षक लाहेमार्ग, पुणे, शितल सुरेश झगडे पोलीस उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची पदस्थापना पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई,
ए.एच चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे जे सध्या पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, त्यांची बदली मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे.
अनिल पारस्कर यांची बदली अपर पोलिस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. एम. राजकुमार यांना संचालक,महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शशीकुमार मीना यांची नियुक्ती अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. प्रविण पाटील यांची बदली अपर पोलिस आयुक्त नागपूर येथे झाली आहे. संजय बी. पाटील यांची बदली अपर पोलीस आयुक्त पुणे शहर येथे करण्यात आली आहे.
वसंत परदेशी यांना देखील नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. एस.डी. आव्हाड यांची बदली अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड येथे करण्यात आली आहे. एस.टी. राठोड यांची बदली पोलीस उप महानिरिक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे करण्यात आली आहे.
पी.पी. शेवाळे यांची नियुक्ती पोलीस उप महानिरिक्षक, दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे करण्यात आली. विनिता साहु यांची बदली अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल या पदावर झाली आहे. निलेश मोरे अपर पोलिस अधीक्षक भंडारा येथे, चंद्रकांत खांडवी पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे, मनिषा दुबळे पोलिस अधीक्षक शस्त्र निरीक्षण शाखा पुणे येथे, वैभव कलबुर्गे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर येथे पदस्थापना देण्यात आली आहे.
प्रदीप वसंतराव जाधव पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती येथे, गोकुळ राज जी. अपर पोलीस अधीक्षक गडचीरोली येथे, दीपक देवराज पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे येथे, मनोज पाटील पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे, जयश्री गायकवाड पोलीस उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग छत्रपती संभाजी नगर येथे, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे, निकेश खाटमोडे पाटील पोलीस अधीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे बदली करण्यात आली आहे.
आण्णासाहेब मारूती जाधव अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज येथे, अजय लक्ष्मण देवरे अपर पोलीस अधीक्षक धुळे येथे, यशवंत अशोक काळे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषन विभाग छत्रपती संभाजीनगर येथे, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथे, रीना जनबंधु पोलीस उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, नागपूर येथे पदास्थापना देण्यात आल्या आहेत. याशिवय आदी एकून 51 आयपीएस अधिकार्यांना पदस्थापना दिल्याचा आदेश गृह विभगाने जारी केला आहे.
Comments