राज्यातील 26 हजार अंगणवाड्या शौंचालयाविना
- Navnath Yewale
- Apr 8
- 1 min read

राज्यातील बालाकांना शिक्षण आरोग्य आणि पोषण मिळावे या उद्देशाने सुरु झालेल्या एकूण आंगणवाड्यापैंकी 26 हजार अंगणवाड्यामध्ये शौंचालय उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. मात्र, राज्यातील 26 हजार 322 अंगणवाड्यासाठी जवळच्या सार्वजनिक शौंचालयाची सुविधा उपलब्ध आहे. असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आंगणवाड्यामध्ये येणार्या बालकाच्या वयाचा विचार करता, त्यांना सार्वजनिक शौंचालयाच्या सुविधेसह सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने आंगणवाडीच्या प्रांगणामध्येच मिळायला हवी ही अनेक वर्षापासून मागणी आहे. मुलांची सुरक्षीतता त्यांना संसर्ग होण्याची शक्यता सुरक्षीतता या मुद्दयांचा विचार सरकार या संदर्भात करते का? असाही प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.
लाभार्थींच्या निवास क्षेत्रात अांगणवाडी सुरु करावी लागते शौंचालय नसल्याने 16 हजार 658 आंगणवाड्या शहरात दाट लोकवस्तीच्या रहीवाशी घरात चालवल्या जातात. तिथे आंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात भाड्याच्या इमरातील आंगणवाड्यामध्ये स्वतंत्र शौंचालय बांधण्यासाठी निधी दिला जातो.
अशा 16 हजार 658 अंगणवाडी केंद्रासाठी सार्वजनिक शौंचालयाचा वापर केला जाता आहे. दरम्यान,2024-25 या वर्षामध्ये शौंचालयाची व्यवस्था नसल्याने स्वमालकीच्या 9 हजार 664 आंगणवाडी केंद्रासाठी बेबी फ्रेंडली शौंचालय जुलैं अखेरपर्यंत उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. आंगणवाड्यासाठी स्वतंत्र जागा अवश्यक असली तरी 20 टक्के आंगणवाड्या या भाड्याच्या जागेमध्ये असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.
राज्यात एकून 1 लाख 10 हजार 631 आंगणवाडी केंद्र असून त्यातील 22 हजार 670 म्हणजेच 21 टक्के आंगणवाड्या भाड्याच्या इमरातीमध्ये आहेत. त्याशिवाय 7 हजार 999 या शाळेच्या इमारतीमध्ये तर 7 हजार 577 आंगणवाड्या इतरत्र कार्यरत आहेत. बालकांना पोषक आणि सकस आहारा सोबत ज्ञाणाचे धडे गिरवता यावेत या उद्देशाने शासनस्तरावरुन महिला व बालविकास विभागामार्फत कार्यरत आंगणवाडी केंद्रातच शौंचालयाचा अभाव असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments