top of page

राज्यात मान्सून सक्रिय, कोकणात कोसळधार; 24 तासांत 18 मृत्यू 65 जण जखमी




राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे, आपत्ती विभागाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिमी तर त्या खालोखाल सिंधुदुर्गात 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय 18 नागरिकांचा मृत्यू झाला असून 65 नागरिक जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये कोंडमाळ दुर्घटनेतील मृतांचा समावेश आहे.


राज्याच्या आपत्ती विभागाचा मागील 24 तासांचा पावसाचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी 18 मृत्यू तर 65 नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान , रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 112 मिमी तर त्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात 110 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या शिवाय मुंबई शहरात 100 मिमी. व मुंबई उपनगरात 86 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून गरज असल्यास घरा बाहेर पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट कायम असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, गरज नसतांना घराबाहेर पडू नये. येत्या 24 तासांसाठी रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरासह उपनगरातही मुसळधार पावसाची नोंद करण्यात आल्याने सखल भागात पाणी साचले आहे. रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आल्याने वाहतूकीस अडळा निर्माण झाला आहे. पाण्याचा अंदाज घेवूनच वाहन चालवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Comments


bottom of page