राज ठाकरे प्रचंड संतापले, फडणवीसांचा एकेरी उल्लेख; आरे तु मुख्यमंत्री ना रे महाराष्ट्राचा...-राज ठाकरे
- Navnath Yewale
- Jul 9
- 2 min read

मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ वर दरड कोसळल्याचं दिसून आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधक, नेटीझन्स यांनी सत्ताधारी आणि सरकारला धारेवर धरलं, यावरुन संतापलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटाकरलं. तसेच माझी बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.हीच बाब आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.9जुलै) रेल्वे कामगार सेनेचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मिसिंग लिंक विविध मुद्यांवरून फडणवीस सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या खटकलेल्या भाषणाचा समाचार घेताना त्यांचा पहिल्यांदा एकेरी उल्लेख केला.
राज ठाकरे म्हणाले, स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण, असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळा मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान होतोय अशा शब्दांत त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत फडणवीसांवरप निशाणा साधला.
मनसे अध्यक्षांनी केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं,तर तुम्ही देशद्रोही” असा आरोपही यावेळी फडणवीस सरकारवर केला. तसेच मिसिंग लिंकवरुन मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू अशा एकेरी भाषेतच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात मिसिंग लिंकबद्दल बोललं, तर त्यात कुठे आला महाराष्ट्राचा अपमान. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का? अशी संतप्त विचारणाही केली. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय, दामदुपटीने यांच्या अंगलट आलं, आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी 10-12 वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मनसे प्रमुखांनी योवळी फडणवीसांच्या ‘ राजकारण करू नका’ या सभागृहातील वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला . ते म्हणाले, वारे वा, त्याच राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण? आपण इतमी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसर्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वत:च्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, भाजपचे लोक म्हणतात, नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. उद्या कुणी असं केलं तर नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. लोकांना सांगा. झाड पडून मुलगा जातो. माणूस जातो. मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक. इतरांचं असल्यावर राजकारण करणार अशी टीकेची झोडही त्यांनी उठवली.



Comments