top of page

राणाला आणले आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर





26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले गेले आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायसालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले.


आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्य फैंरी झडताना दिसत आहेत. अनेकांनी तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत केंद्र सरकारचे कौंतुक केले आहे.



26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातून सहीसलामत वाचलेले आणि ज्यांनी कसाबची ओळच पटण्यात न्यायालयात अतिशय महत्वाची साक्ष दिली, त्या नटवरलाल रोटावन आणि देविका रोटावन यांनी तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. राणाला फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.मिडियाशी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कौंतुकोद्गार काढले आहेत.


आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर


तहव्वूर राणाला भारतात आणले आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर आहे. आम्ही भारतीय आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा बिमोड केला. तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा सुनावली जाईल, तेव्हा भारताचा जयजयकार केला जाईल. तहव्वूर राणाला भारतात आणले जाण हा मोठा विजय असल्याचे नटवरलाल रोटावन यांनी म्हटले आहे.



त्याचबरोबर हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानात असलेल्या अन्य मास्टरमाईंड दहशतवाद्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी भावना देविका रोटावन यांनी व्यक्त केली

コメント


bottom of page