top of page

राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात, या चर्चांवर पडदा पडला! मुंबईत देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमारांची बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.26) राष्ट्रवादीच्या आजी- माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार,मंत्री,ज्येष्ठ नेते उपस्थिती होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नसल्याचं आमदारांनी सांगितले. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांध्ये चर्चा झालयनंतर या दोन्ही नेत्यांनी नाराज नसल्याचं सागितलेलं आहे. परंतु पक्षाची सर्व सूत्रं सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी आपल्या हाती घेतले आहेत. राष्ट्रवादी पक्षातील एकूण 20 ते22 आमदार खासदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जात होता. यावर आता पडदा पडला आहे.


मुंबईतील देवगिरी शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आजी- माजी आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या बैठकीस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर होते. याच बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


दरम्यान, बैठक पार पडल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री म्हणाले की, निवडणुक आयोगाच्या एसआयआर प्रणाली संदर्भात बैठकीत चर्चा झाली. बीएलओ आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी कसं काम करावं या संदर्भात चर्चा झाली. त्या संदर्भात काही तज्ज्ञ लोक आले होेते. त्यांनी मार्गदर्शन केले. 10 जून पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याची जागा ठरवली जाईल. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाली असं मंत्री भूजबळ म्हणाले.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वीस ते बावीस आमदार पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशा वावड्या उठल्या होत्या, त्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. पण सर्व आमदारांनी छातीठोकपणे सांगितलं की आम्ही पक्षासोबतच आहोत. आम्ही कुणाच्या संपर्कात नाही, नाराजी काही नाही, समोरुन लोक बोलतात म्हणून बातम्या होतात असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राज्यात शेतकर्‍यांना भेडसावत असलेल्या कांदा प्रश्नावरही मंत्री भुजबळ म्हणाले काद्यांच्या प्रश्नावर उद्या महायुती शिष्टमंडळ दिल्लीत अमित शाह यांची भेअ घेणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की कांदा उत्पादकांना न्याय मिळावा असंही भुजबळ म्हणाले.

Comments


bottom of page