राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात ..
- Navnath Yewale
- May 22
- 1 min read

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवांडे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘ माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस ठाण्याचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरुन कसलाही पुरावा नसतना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफिवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन,वकील,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार असल्याचंही ते म्हणाले.
विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते त्यांना घेऊन वाघोली पोलिस ठाण्यात गेले आहे. या विषयी लवांडे यांनीच आपल्या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. लवांडे यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
वारकरी सांप्रदयात घुसखोरीचा आरोप:
वारकरी संप्रदायात हिंदुत्ववाद्यांची घुसखोरी झाली आहे, असे म्हणत काही महाराजांच्या नावाची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर बापू भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांनी लवांडे यांच्यावर शाही टाकली. या प्रकरणी त्यांना पोलिसांमध्ये तक्रार केली.



Comments