top of page

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा

मुलास नोकरी लावण्याचे अमिष, पिडितेवर 16 वर्षे अत्याचार; आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराडवर गंभीर आरोप


बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सतत धक्कादायक प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व त्याचे साथीदार सध्या तुरुंगात आहेत. त्यापाठोपाठ आता बीड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणार्‍या एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पिडितीच्या मुलाला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून अत्याचार करण्यात आले. या महिलीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याने एका महिलची फसवणूक केली आहे. 2006 ते 2022 या दरम्यान तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे अमीष दाखवून नारायण शिंदे याने सलग 16 वर्षे पिडितेवर अत्याचार केले. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर पवार यांनी दिली आहे. नारायण शिंदे हा नेकनूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि अत्यंत जवळीक असलेला कार्यकर्ता आहे. दरम्यान, फिर्यादीमध्ये पिडितेने आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.


आरोपी नारायण शिंदे याने महिलेकडून एक कोटी दहा लाख रुपये घेऊन पुण्यात फ्लॅट घेऊन देतात असे म्हणत फसवणूक केल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये केला करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली तर तुला जीवे मारुन टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे अशी धमकी देण्यात आल्याचे देखील पिडितीने तक्रारीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर पवार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.

Comments


bottom of page