top of page

राहूल गांधीचा काश्मीर दौर्‍यावर; सीमावर्ती भागातील शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यानिमित्त आज ते पूंछ येथे दाखल झाले आहेत. पूंछ हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळचा भाग आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली होती. या मोहिमेनंतर पाकिस्तानी लष्कराने भारताच्या सीमेवरील गावांमध्ये गोळीबार सुरू केला. प्रामुख्याने काश्मीरच्या पूंछमधील नागरिकांना पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पूंछमधील अनेक नागरिकांचा बळी गेला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आज पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुुंबियांची भेट घेतली.


“ तुम्ही काळजी करू नका, सगळं ठिक होईल”

पूंछमधील नागरिकांना भेटल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वांना अश्वासन दिलं की “ या भागातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल” राहुल गांधी यांनी पूंछमधील एका शाळेला भेट दिली. सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या परिसरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी विद्यार्थ्यांना म्हणाले “ तुम्ही धोका, हल्ले आणि भयानक स्थिती पाहिली आहे. परंतु, तुम्ही काळजी करू नका. सगळं काही ठिक होईल. तुम्ही खूप अभ्यास करा, खूप खेळा, खूप मित्र बनवा, हाच या समस्येशी (दहशतवाद) सामना करण्याचा मार्ग आहे.


राहुल गांधीकउून पूंछमधील नागरिकांचं सांत्वन :

राहुल गांधी त्यांच्या दौर्‍यावेळी जम्मू- काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा व मुख्यमंत्री ओमर अब्दल्लाह यांना देखील भेटणार आहेत. दरम्यान, जम्मू- काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा राहुल गांधी यांच्या या दौर्‍याबाबत म्हणाले, “ या युद्धामुळे पूंछमध्ये सार्वाधिक नुकसान झालं ओह. त्यामुळे राहुल गांधी आज पूंछमधील लोकांना भेटी देतील. तिथल्या लोकांशी संवाद साधतील. या गोळीबारात जी लहान मुलं ठार झाली आहेत त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत”


ओमर अब्दुल्ला यांच्याकडून तृणमूलचे कौतुक :

जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रहाुल गांधी यांच्या दौर्‍याबाबत आधीच माहिती दिली होती. तसेच त्यांनी पिडीत गावांना भेटी देणार्‍या नेत्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, “ राहुल गांधी पूंछचा दौरा करतील. ते तिथल्या लोकांना भेटतील. झालेल्या हानीबाबत त्यांच्या संवेदना व्यक्त करतील. ही एक प्रकारची मोहिम असून ती सुरू केल्याबद्दल मी तृणमूल काँग्रेसचे आभार मानतो.


त्यांचे पाच सदस्य काश्मीरला आले आणि त्यांनी पिडीत गावांचा दौरा केला. त्यांनी पूंछचा देखील दौरा केला. आता ते राजौरीमध्ये आहेत. उद्यापासून ते जम्मूचा दौरा करतील. ते इथे आले आणि आता ते लोकांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. या कठीण काळात काही लोक आमच्याबरोबर आहेत आणि आम्हला त्यानं बरं वाटत आहे.

Comments


bottom of page