top of page

र्पराज्ञीत निष्पर्ण झाडावर नखशिखांत सौंदर्याचा बहर! लाल - पिवळ्या फुलांनी सोनसावर ,काटेसावर बहरली...

बीड :सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रातील सांस्कृतिक नंदनवनात निष्पर्ण झालेली दुर्मिळ वृक्ष सोनसावर ,काटेसावर सोनेरी पिवळ्या, लाल रंगांच्या फुलांच्या सौंदर्याने नखशिखांत बहरली आहेत.

सर्पराज्ञीत गेल्या सात वर्षांपूर्वी सर्पराज्ञीचे मार्गदर्शन आदरणीय क्षितिज हीर्लेकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक नंदनवन निर्माण करण्यात आले होते. या नंदनवन मध्ये 30 प्रकारच्या वनांची निर्मिती करण्यात आली होती. मध्यंतरी आग लागू या वनातील काही वृक्ष जवळ नष्ट झाली मात्र काही पुन्हा फुटली .त्यातीलच नवजीवन मिळालेल्या दुर्मिळ सोनसावर व काटेसावर या दोन वृक्ष

चांगलीच फुलांनी भरून गेली आहे.

हे दोन्ही झाडे पर्यावरणीय, सांस्कृतिक व आयुर्वेदिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पक्षांचा जूस बार, "काटेसावर"

पक्ष्यांचा ज्यूसबार म्हणून काटेसावरास ओळखले जाते.

कारण या वृक्षाला उन्हाळ्यात आलेल्या याच्या मोठ्या, लाल-गुलाबी फुलांमधून पक्षांना भरपूर मधुरस मिळतो, जवळपास ५४ प्रकारचे पक्षी या फुलांमधून मधुरस शोषून घेण्यासाठी येतात. तसेच हे झाड इतर वन्यजीवांसाठी नैसर्गिक अन्न आणि पाण्याचा स्रोत बनल्याने त्यांची तहान-भुकेची गरज पूर्ण करतो. आणि पक्ष्यांना आकर्षित करतो. हे झाड अनेक पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे नैसर्गिक 'ज्यूस सेंटर' म्हणून काम करते.

धार्मिक पवित्र वृक्ष "सोनसावर"

"सोनसावर वृक्षास बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. बौद्ध परंपरेत असे मानले जाते की बोधिवृक्षाच्या शेजारी सोनसावर वृक्ष होता. जेथे बुद्धांना ज्ञान प्राप्त केले होते.श्रीलंकेमध्ये बौद्ध मठाच्या आवारात हमखास या वृक्षांची लागवड केली जाते.


हिंदू धर्मात
सोनसावर वृक्ष शनी देवाचा आराध्य वृक्ष मानला जातो. पूजा- अर्चना मध्ये सोनसावरच्या पानाचा वापर केला जातो. घरामध्ये सोनसावराचे पान ठेवणे शुभ व फलदायी मानले जाते.
तसेच औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक उपचारांमध्ये ही या वनस्पतीचा उपयोग केला जातो."
सिद्धार्थ सोनवणे

(वन्यजीव अभ्यासक)

Comments


bottom of page