top of page

लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू! महाराष्ट्र दिनी खात्यात येणार 1500 रुपये



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणार्‍या महिलांना 500 रुपयांचा हप्त दिला जातो.


एप्रिलचे पैसे मिळणार काही तासात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहिर करण्यात आल्या प्रमाणे अक्षय्य तृतीयेला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती हा हप्ता देण्यासाठी सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किती महिलांना एप्रिलाचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.


किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार ?

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरूवात करताना दोन शासन निर्णय जारी करण्यात आले होते. दरम्यान, 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी जाहिर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ न घेणार्‍या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरीत करण्यात येतो.


इतर शासकिय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणार्‍या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरीत करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील.


एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळ्यात आले नसून, प्रक्रियेत 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून आतापर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. या हप्त्याचे 1500 मिळून लाडक्या बहिणींना एप्रिल अखेर 1500 त्यांच्या खात्यात मिळाले असतील.

आता महिला व बालविकास विभागानं लाडकी बहिण योजनेतून एप्रिल महिन्यात किती महिलांना रक्कम दिली याची माहिती येत्या काही दिवसांत समोर येईल. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महायुतीच्या विजयात महत्वाची ठरली होती.

댓글


bottom of page