top of page

लातुरमध्ये दोन प्रवासी वाहतूक बसचा भीषण अपघात , दोघांच मृत्यू




लातूरमध्ये दोन प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन खासगी बसची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाातची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन लातूरकडे जात असलेल्या एका खासगी बसने दुसर्‍या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात लातूर-तुळजापूर महामार्गावर आशीव पाटी ते उजनी दरम्यान झाला. या अपघात बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शिवाय 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ लातूरच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Comments


bottom of page