लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीना घरात घुसून गोळ्या घालण्याची भाजपच्या पदाकिार्याची धमकी
- Navnath Yewale
- Feb 19
- 2 min read
काँग्रेसच्या 25 खासदारांनाही धमकी; काँग्रेससह समविचारी पक्षांकडून निषेध

नवीदिल्ली: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप आणि करणीसेनेच्या एका पदाधिकार्याने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू ’ अशी धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या 25 खासदारांना देखील त्याने धमकी दिली आहे. या व्हिडीओमुळे मिडीयावर खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाजपचा पदाधिकारी राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. युवा काँग्रेसने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, धमकी देणार्या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.
भाजपचा पदाधिकार्याने राहुल गांधी यांना धमकी देताना या व्हिडीओत सांगितले की, ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये घुसून काँग्रेसच्या 25 खासदारांनी ओम बिर्ला यांना शिवीगाळ केला. या घटनेचा आम्ही भाजप आणि करणीसेनेचे कार्यकर्ते निषेध करतो, राहुल गांधी यांच्या सयांगण्यावरून हे केले गेले राहुल गांधींनी नीट ऐकावे, पुन्हा अशयी घटना घडली तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल. काँग्रेसच्या 25 खासदारांवर कारवाई केली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांचे विधान ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत. जर 24 तासांमध्ये त्या 25 खासदारांना अटके होत असेल तर ठिक आहे. नाही तर प्रत्येकाला घरात घुसून आम्ही गोळ्या घालू. मला जेल झाली तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही,
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘ संपूर्ण आरएसएस-भाजप यंत्रणा गाडेसे फॅक्ट्री आहे. राहुल गांधी आणि 25 खासदारांना करणीसेनेने दिलेली धमकी ही एक वेगळी घटना नाही तर ती एक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातील किरण रिजिजू यांनी दावा केला की काँग्रेस खासदारांनी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांचा अपमान केला. पण व्हिडिओमध्ये असे काहीही दिसत नाही. त्याऐवजी सभापती हसताना दिसत आहेत. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनीतोच शब्द पुन्हा सांगण्यास सुरुवात केली की राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षेसयाठी धोका आहेत,
पवन खेडा पुढे असे म्हणतात की, ‘हे’ सर्व विररोधकांना बदनाम करण्याचा आणि विशेषत: राहुल गांधिविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. धर्मांध राजकारण अशा प्रकारे चालते. आधी खोटे पसरवायचे आणि नंतर ते पुन्हा पुन्हा सांगून लोकांमध्ये राग आणि द्वेष निर्माणए करणे. गोडसेची निर्मिती भूतकाळात असे वातावरण निर्माण करण्यासाठी झाली होती आणि आता पुन्हा असेच वातावरण निर्माण केले जात आहे.



Comments