top of page

वनविभागाचा अवैध लाकूड वाहतूकीवर कारवाईचा फार्स! शिरुर तालुक्यात वृक्षतोडबंदी, चाराईबंदी, कुर्‍हाडबंदीचा फज्जा; सर्रास अवैध लाकूड वाहतूक


बीड: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावरून निसर्गसंगोपन,संवर्धनाच्या उपाय योजना राबवण्यात येत आहेत. वन्यजीव संरक्षणासाठी वृक्षतोडीवर कायद्यान्वये प्रतिबंध असला तरी बीडच्या शिरुर कासार तालुक्यात नियमांची सर्रास पायामल्ली केली जात आहे.विशेष म्हणजे यास जबाबदार वनविभागाकडूनच खतपाणी घालण्यात येत असल्याने निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.


खासगी क्षेत्राच्या तुलनेत किमान 32 टक्के वनक्षेत्र या निकषांनुसार बीडच्या शिरुर कासार तालुक्यात सन 1992 मध्ये महाराष्ट्र शासनाची शेकडो हेक्टर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषीत झाली. देखभालीसह संगोपनाची जबाबदारी असलेल्या वन विभागाकडून तालुक्यात मोजक्या वनक्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली.


मात्र, काही (महामार्ग, राज्यमार्ग लगतच्या जमीनीवर प्रभावी उपाय योजना राबवण्यात वन विभागाला अद्याप मुहूर्त सापडला नाही. परिनामी सताड पडलेल्या आणि कायम बोडखे राखीव वनक्षेत्राचं माळरान मानवी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलं आहे. त्यामुळे तालुक्यात वनक्षेत्राची घट वनजीवांच्या अस्तीत्वावर बेतली आणि भक्ष्य, शिकारीच्या शोधात हिस्त्र, शिकारी वनजीवांनी माणवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला.


वृक्षतोडीवर नियंत्रण नाही? : जबाबदार प्रशासनाच्या अधिकारी कर्मचार्‍यांना हाताशी धरून बेसूमार वृक्षतोड केली जात आहे. खासबी क्षेत्रातील वृक्षतोडीसाठी शासनाच्या वनखात्याने परवानगीसह काही निकष लागू केले असले तरी चक्क चिरीमिरी घेवून सोयीस्कर विनापरवाना वृक्षतोड, वाहतूक केली जात आहे.


वनक्षेत्रातही नियमांचा फज्जा: राखीव वनक्षेत्रात कुर्‍हाडबंदी, चराईबंदीचे कडक निर्देश असताना तालुक्यात घनदाट वनासह राखीव वनक्षेत्रात चराईबंदीचा फज्जा उडाला आहे. याशिवाय कोट्यावधी रुपये पाण्यावर खर्च करून जगवलेल्या झाडवर कुर्‍हाड चालवण्यात येत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नगरिक सांगत आहेत.


सर्रास अवैध लाकुड वाहतूक: तालुक्यात विना नंबरच्या वाहनातून सर्रास लाकूड वाहतुक करण्यात येत आहे. दरम्यान, कधी अंधाराचा फायदा घेवून तर कधी भल्या पहाटे लाकूड वाहतूक करण्यात येत असली तरी जबाबदार प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संगनमतानेच अवैध लाकूड वाहतूकीला बळ मिळत आहे यात शंका नाही.


अतिक्रमणाला बळ: राखीव वनक्षेत्रात मानवी अतिक्रमण होत असताना वनविभाग जानिवपूर्वक डोळेझाक करत आहे. प्रत्यक्षात वनक्षेत्राच्या हद्दबंदीचे सोयीस्कर कारण पुढे करत अतिक्रमण धारकांकडून हात ओले करून अतिक्रमणाला वनविभागाकडूनच बळ मिळत असल्याचा आरोपही केला जात आहे.


कारवाईचा फार्स: तालुक्यातील खालापुरी शिवारात नुकतीच वनविभागाकडून अवैध लाकुड वाहतूक करणार्‍या एका टॅम्पोवर कारवाईचा बडेजावपणा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कारवाईमध्ये वाहनात लाकुड कोणते?, त्याचे बाजा मूल्य किती?, फडझाडचे लाकुड आहे का?, तोडपरवाना आहे का? या बाबींचा कसलाही खुलासा करण्यात आलेला नाही. शिवाय कारवाईत जप्त वाहनाची तडजोड करता यावी या उद्देशाने ते शिरुर शहरा जवळील एका सॉमिलच्या आवारात लावण्यात आले आहे. ज्यामध्ये चिंच या झाडाचे लाकुड असल्याचा संशय निसर्गप्रेमीतून व्यक्त केला जात आहे.

 
 
 

Comments


bottom of page