वन विभागाच्या वतीने सर्पराज्ञीत जागतिक पर्यावरण दिन साजरा
- Navnath Yewale
- Jun 5
- 1 min read

वन विभाग बीड .वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा (प्रा) यांच्या वतीने सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव .ता.शिरूर जि.बीड. येथे आज दिनांक ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
५ जून जागतिक पर्यावरण दिन .या दिनाचे औचित्य साधून वन विभाग बीड वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा (प्रा )यांच्या वतीने विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव येथे सर्पराज्ञीचे संचालक वन्यजीवांचे पिता सिद्धार्थ सोनवणे , वनपालअजय देवगडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड,पिंपळ, पिपरी, चिंच, जांभूळ, आदी वृक्षांचे रोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .

कार्यक्रमास वन्यजीवांचे माता -पिता सृष्टी सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, वनपाल अजय देवगुडे, वनरक्षक नवनाथ काकडे, गणेश सानप,संदीप राठोड, दादासाहेब यदमल, संगीता पवार वन कर्मचारी रामेश्वर बेंद्रे, अंबादास लवांडे, सत्तर शेख, आप्पासाहेब सातपुते, सोपान येवले, सतीश गरजे, गहिनीनाथ दानवले, भीमराव सव्वाशे आदी उपस्थित होते.
Comentários