वर्षावर खलबते, भाजपच्या मॅराथॉन बैठकांचे सत्र; आरएसएसची भाजप प्रदेशकार्यालयात बैठक
- Navnath Yewale
- Jul 15
- 2 min read

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, त्यात महापालिका निवडणुक विशेष लक्षवेधी ठरणार्या आहेत. आगामी काही महिन्यांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महत्वाच्या महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? महापौर कोणत्या पक्षाचा असेल? याबाबत सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती गटबाजी, युती -बिघाडी पाहता मुंबई महापालिकेची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची होण्याची संकेत मिळत आहेत. शिवसेना ( ठाकरे गट) शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात या निवडणुकीसाइी जोरदार रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभुमिवर प्रत्येक पक्षात मोठ्या प्रमाणावर बैठका, रणनिती ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांनीही आपले प्रचारकार्य सुरूकेलेल्याचे चित्र अनेक भागात आहे. अशातच मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिला आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला पाहिजे असा कानमंत्र भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिल्याची माहिती आहे. आपापल्या मतदारसंघातील सर्वात महत्वाची पाच कामे सांगा, स्थानिक समित्यांचे वाटप करण्याचा सर्व अधिकार तुम्हाला आहे. महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद मी स्वत: देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलं आहे. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वर्षावर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना सुचना दिल्या आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, योगेश सागर, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, अमित साटम यांची बैठकीला उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी काळात विभागवार बैठका घेण्याची शक्यता आहे. काल सोमवारी (14 जूलै) रात्री उशीरा मराठवाड्यातील आमदारांची बैठक वर्षावर पार पडली. फडणवीस यांनी आमदारांना महत्वाच्या सूचना देत विभाग निहाय बैठकीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजप प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत महत्वाची बैठक बोलावली आहे. मुंबई, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही प्रमुख आमदार बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. भाजप प्रदेशाध्य रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित ही बैठक बोलावण्यात आली आहे.


Comments