top of page

वाल्मिकने खंडणी मागितलेल्या अवादा कंपणीवर दरोडा सुरक्षारक्षकाचे हात-पाय बांधले, 13 लाखांवर केबलची चोरी




मस्साजोग येथील संरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये नंतर अवादा कंपणी चांगलीच चर्चेत आली. अवादा कंपणीला मागितलेल्या खंडणीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे चार्जसीटमधून समोर आले आहे. आता या कंपणीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अवादा कंपणीवर दरोडा पडला असून तब्बल 13 लाखांची चोरी झाली आहे.


संरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येनंतर या जिल्ह्यात सुरू असलेला पवनचक्की उद्योग सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. मस्साजोग या गावात असलेल्या अवादा कंपणीच्या पवनचक्कीच्या मालकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी गेलेल्या काही आरोपींना अटकाव घातला याचा राग मनात ठेवून संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या करण्यात आली. आत ही कंपणी पुन्हा चोरांच्या निशान्यावर आली आहे. तोंडाला मास्क बांधून आलेल्या 14ते 15 जनांनी दरोडा घातला आहे. कंपणीतील 13 लाखाच्या केबलची चोरी केल्याची माहिती आहे. त्या नंतर कंपणीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.



प्राप्त माहितीनुसार अवादा कंपणीतील जवळपास साडेतेरा लाखाच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली आहे. कंपणीतील सुरवायझर आणि सुरक्षेसाठी तैंनात असलेल्या सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना मारहाण करून धमकी देत चोरी केली आहे. अवादा कंपणीची पवनचक्की विडा परिसरात उभारली जात आहे. या ठिकाणी असलेले 13 लाख रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या अभिजीत दुनघव, आकाश जाधव या दोघांना त्यांच्याकडीलच चादर काढून हात- पाय बांधुन ठेवले व साहित्य चोरून नेले.


या बाबतची माहिती सुरक्षारक्षकांनी कंपणीच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसातील चोरीची ही दूसरी घटना असून आता अशा घटना टाळण्यासाठी कंपणीने सुरक्षारक्षक तैंनात केले आहेत. अवादा कंपणीला एमएसएफची सुरक्षा देण्यात आली आहे. 25 जवान दिवस रात्र सुुरक्षेसाठी तैंनात करण्यात आले आहेत. अवाद कंपणीच्या मुख्य प्लँटसह पवनचक्की उभारण्याच्या ठिकाणी देखील हे जवान पेट्रोलींग करणार आहेत.

Commentaires


bottom of page